कोकण कट्टा लाईव्हतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन kokan katta live ganpati Festival 2023

banner 468x60

यावर्षीही कोकण कट्टा लाईव्हतर्फे ‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023’चे (Home Ganesha Decoration Competition) आयोजन केले आहे.

विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देण्‍यात येणार आहे. गणराया हा सर्वांचा लाडका बाप्पा आहे.

बालगोपाळ आपापल्या घरी गणपतीची स्थापना करताना मोठ्या प्रमाणात सजावट करतात. ही बाब लक्षात घेवूनच या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ तुमचा बाप्पा बनेल लाईक्सचा राजा ! आपल्या घरगुती बाप्पाची सजावट करा, केलेल्या सजावटीचे फोटो आमच्या वेबसाईट, युट्यूब, फेसबुक पेजवर पाहता येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत गणेश भक्तांनी सहभागी व्हावे ही विनंती.

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा
गणपतीसाठी आरास व सजावट स्पर्धा
कोकण कट्टा लाईव्ह पुरस्कृत

प्रवेश दिनांक १९सप्टेंबर २०२३ ते २४सप्टेंबर २०२३ पर्यंत
प्रवेश विनामूल्य आहे

कोकणातील लोक नाव नोंदणी करू शकतात.
पहिल्या 50 सभासदांनाच या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.

बक्षीस:
प्रमाणपत्र दिले जाईल, आणि एक छोटीशी भेटवस्तू देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम व अटी:
१) गणपतीची आरास पूर्णतः पर्यावरण पूरक असावी
२) गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीची असावी
३) एखादा सामाजिक जनजागृतीपर संदेश असावा. उदा., झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छतेचा संदेश देणारी सजावट, प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारी सजावट, पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देणारी सजावट, विजेवर चालणारी वाहने चालवण्याचे फायदे, गाई पाळण्याचे फायदे, शेती करण्याचे फायदे इत्यादी.


४) आरास व अन्य सजावट यामध्ये थर्माकोलचा वापर नसावा
५)सजावटी संदर्भातला व्हिडिओ स्वतः सजावटकाराने करावा
६) व्हिडिओ जास्तीत जास्त ३ते ४मिनिटांचा करा व्हिडिओ हा आढावाच असावा

सदरची स्पर्धा विनामूल्य आहे.आपल्या गणेशोत्सव सजावटीचे व्हिडिओ, फोटो कोकण कट्टा लाईव्ह youtube,चॅनल
तसेच पोर्टल वर प्रसारित करण्यात येतील

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

नोंदणी साठी संपर्क kokankattalive3128@gmail.com
या मेल वर किंवा
9960151909

व्हॉट्स अप क्रमांकावर नाव, गाव, मोबाईल क्रमांक आदी माहिती पाठवावी.

https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *