Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला
Kokan  

चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे आणि कुंभार्ली येथे दोन बंद घरांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ४ लाख २६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घरफोडी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अलोरे वरचीवाडी येथील समर्थ बैठक हॉलसमोरील संजीव रघुनाथ चव्हाण (वय ३७) यांच्या राहत्या घराचे पुढील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी हत्याराच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरी केल्यानंतर घराच्या दरवाजाला दुसरे नवीन कुलूप लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच कालावधीत कुंभार्ली गावातील नम्रता नंदकुमार आडविलकर यांच्या घराचेही कुलूप कशाच्या तरी सहाय्याने कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि चोरी केली. या घरालाही चोरीनंतर नवीन कुलूप लावण्यात आले होते. दोन्ही घरांना एकाच प्रकारचे लॉक लावण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तूंवर डल्ला

चोरट्यांनी सोन्याचे तीन पदरी मंगळसूत्र, सोन्याचा हार, कानातील टॉप्स, सोन्याच्या रिंग, चार सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नथ, चांदीचा सुमारे १०० ग्रॅम वजनाचा तुकडा आणि गणपतीचे चित्र असलेले चांदीचे नाणे असा ऐवज चोरून नेला आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख २६ हजार २८० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संजीव रघुनाथ चव्हाण यांनी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३६ वाजता अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच परिसरातील दोन घरांना लक्ष्य करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घरफोड्यांमागे एकाच टोळीचा हात आहे का, यासह चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.