Breaking News
रत्नागिरी : कौटुंबिक वादातून मेहुण्यावर लोखंडी फुकणीने हल्ला, डोक्यात सात ते आठ वार, दोघांविरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी : आजाराच्या त्रासाला कंटाळून 36 वर्षीय विवाहितेने जीवन संपवले मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास दापोली बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला , मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे, ओळख पटविण्याचे आव्हान, दापोली पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद चिपळूण : डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांचा गौरव; एबीपी माझा ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराबद्दल विशेष कौतुक सोहळा, चिपळूणमधील तीन वाचनालयांचा संयुक्त पुढाकार

मंडणगड : येथे शेतजमिनीवरील सीसीटीव्ही यंत्रणाच चोरट्यांनी पळवली, चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन लंपास

banner 468x60

मंडणगड तालुक्यात शेतजमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेतजमिनीवर लावलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचे डीव्हीआर मशीन असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधेरे येथील मदन परबत दळवी यांच्या मालकीची जमीन असून, या जमिनीचे सर्व्हे क्रमांक ३२(१), ३२(२), ३२(५), ३३(६) आणि ३३(७) असे आहेत. या जमिनीवर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही यंत्रणा चोरून नेली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये प्रत्येकी अंदाजे १ हजार २५० रुपये किमतीचे चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या चार कॅमेऱ्यांची एकूण किंमत पाच हजार रुपये असून, त्यासोबत पाच हजार रुपये किमतीचे एक डीव्हीआर मशीनही चोरट्याने पळवले आहे. चोरीस गेलेले सर्व कॅमेरे आणि डीव्हीआर मशीन चालू स्थितीत होते. अशा प्रकारे एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या घटनेची तक्रार बाळाराम अनंत जोशी (वय ४०, व्यवसाय मजुरी, रा. दुधेरे, बारकोंबडावाडी, ता. मंडणगड) यांनी पोलिसांकडे दिली आहे. संबंधित जमीनमालक मदन परबत दळवी यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर तक्रार देण्यात आल्याने पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास काहीसा विलंब झाला. त्यानंतर २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.१३ वाजता या चोरीची अधिकृत नोंद करण्यात आली.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संबंधित ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या चोरीमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.