दापोली बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये एक अनोळखी पुरुष निपचित अवस्थेत आढळून आल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्षे असून त्याचे नाव व गाव याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. २५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान तो दापोली बसस्थानकाच्या बाजूच्या गल्लीमध्ये निपचित पडलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना दिसून आला.
नागरिकांनी तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रात्री ९ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून तो कोणत्या परिसरातील रहिवासी होता, याबाबत माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या व्यक्तीला ओळखणाऱ्या नागरिकांनी दापोली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













