राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम हे आज, बुधवारी (२५ नोव्हेंबर) मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दौरा कार्यक्रमानुसार, राज्यमंत्री योगेश कदम हे सकाळी ७ वाजता कांदिवली (मुंबई) येथील ‘पालखी’ निवासस्थानातून मोटारीने मंडणगडच्या दिशेने रवाना होतील. सकाळी ११.२६ वाजता त्यांचे भिंगळोली येथील केणे ईस्टेट, समर्थनगर येथे आगमन होणार आहे.
त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत मंडणगड पंचायत समिती सभागृहात जलजीवन मिशन नळपाणी योजनांची आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तालुक्यातील विविध नळपाणी योजनांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.
बैठकीनंतर राज्यमंत्री कदम हे सोयीनुसार जामगे किंवा सोवेली (ता. खेड/मंडणगड) येथील निवासस्थानी रवाना होतील. तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













