संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी पिकअप गाडी साखरपा पोलिसांनी पकडली. पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुरांसह संबंधित पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपती सावंत (वय ३९, रा. येळाणे, ता. शाहूवाडी) हा आपल्या ताब्यातील एमएच ०७ पी ३६१६ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गुरांची वाहतूक करीत होता. मुंडे तर्फे सावर्डे येथून येळाणे, तालुका शाहूवाडी येथे गुरे घेऊन जात असताना त्याचे वाहन कोंडगाव तिठा येथे आले.
यावेळी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना संबंधित वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मनस्वी पावसकर यांनी तातडीने कारवाई करत पिकअप वाहनासह गुरे ताब्यात घेतली आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्रात आणली.
वाहनातील गुरांची किंमत अंदाजे २५ हजार रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत.
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात गुरांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











