रत्नागिरी : घरफोडीचा छडा, 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत, संशयित ताब्यात

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात प्रवेश करून १३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी तपासाला गती दिली. गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी संशयिताचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान संबंधित इसमाकडून चोरीस गेलेले १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, चोरीस गेलेल्या रोख रकमेबाबत तसेच संशयिताच्या नावाबाबत अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, नितीन डोमणे, अमोल भोसले, पुनम ढवळ, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.