देवरुख-रत्नागिरी मार्गावरील आंबव परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसणी गावातील केतन संजय मोहिते यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तुळसणीसह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देवरुख-रत्नागिरी मार्गावरील आंबव परिसरात भीषण मोटारसायकल अपघात घडला होता. या अपघातात तुळसणी येथील केतन संजय मोहिते हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या महिनाभरापासून केतन यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ आशावादी होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून अनेकजण प्रार्थना करत होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली आणि कुटुंबीयांसह सर्वांच्या आशा संपुष्टात आल्या.
केतन मोहिते हे तरुण वयातील हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका अपघातामुळे उमलत्या वयातील तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने तुळसणी गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
केतन यांच्या निधनाने एक हसतमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













