रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून एका ३३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) सकाळी घडली. प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३, रा. नाखरे-बोरभाटलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे नाखरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका आडविलकर या गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ ते ९ वाजण्याच्या दरम्यान त्या घराबाहेर पडल्या. यावेळी त्या विहिरीच्या दिशेने गेल्या असता विहिरीत पडल्याची घटना घडली. त्या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांनी प्रयत्नपूर्वक त्यांना विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती त्यांचे वडील लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अ.मृ. क्रमांक ४१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. ३३ वर्षीय तरुणीच्या अशा दुर्दैवी निधनामुळे नाखरे-बोरभाटलेवाडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














pinco bakara https://pinco30260.shop/