चिपळूण : 62 वर्षीय वृद्धाची आत्महत्या, परिसरात हळहळ

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मालघर महाडिकवाडी येथे ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घराच्या अंगणातील मंडपाच्या लोखंडी पाइपला विजेच्या वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी उघडकीस आली. अशोक पांडुरंग महाडिक (वय ६२, रा. मालघर महाडिकवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे मालघर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक महाडिक यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या घराच्या अंगणातील मंडपाच्या लोखंडी पाइपला विजेची वायर बांधून गळफास घेतला. ही बाब कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना खाली उतरवून उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.


मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.


अशोक महाडिक यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.


या घटनेची माहिती मयताचे चुलत भाऊ गंगाराम हरी महाडिक यांनी चिपळूण पोलिसांना दिली. त्यानुसार चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *