संगमेश्वर : ओझरेखुर्द येथे 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे मंदार अनिल केदारी (वय २१) या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे ओझरेखुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओझरेखुर्द येथे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मंदार केदारी याच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला.

या तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारणातून ही घटना घडली की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *