दापोली : आंजर्लेत तरुणाची आत्महत्या

banner 468x60


मुंबईतून १५ दिवसांपूर्वी गावी आलेल्या तरुणाने हाताची नस कापून, गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान आंजर्ले- मुर्डी (ता. दापोली) येथे उघडकीला आला.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

प्रसाद धाडवे (२७) असे त्याचे नाव आहे.

प्रसाद धाडवे हा मुंबई येथे नोकरीला होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो आंजर्ले – मुर्डी येथे आला होता.

गुरुवारी घरातील सारी मंडळी बाहेर गेलेली असताना प्रसादने हाताची नस कापली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील मंडळी सायंकाळी घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी . दाखल करण्यात आले होते. त्यानंतर न दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *