Breaking News
खेड : 51 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेऊन मृत्यू, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले दापोली : स्वरा चव्हाणचे मैदानी स्पर्धेत दुहेरी यश, गोळाफेकीत रौप्य, थाळीफेकीत कांस्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड चिपळूण : दोघांचं प्रेम लपवण्यासाठी तिसऱ्याचा बळी? अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, मृत्यूप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा, बदनामी आणि मानसिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप, मृत्यूपूर्वी चिठ्ठीत माहिती समोर दापोली : बेकायदा मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त, एकाविरोधात गुन्हा दापोली : चिखलगाव बॉक्साईट प्रकल्प आणि भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची धडक, चिखलगावातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग, तहसीलदार अर्चना बोंबे यांना निवेदन

दापोली : बेकायदा मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त, एकाविरोधात गुन्हा

banner 468x60

दापोली शहरात बेकायदा मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली एस.टी. बसस्थानकासमोर असलेल्या स्वागत हॉटेलच्या मागील बाजूस, स्टेपीन बारजवळ एका व्यक्तीकडून बेकायदा मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याचे आढळून आले. संबंधित व्यक्ती नागरिकांकडून पैसे स्वीकारून कोणताही परवाना नसताना मटका जुगार चालवत असल्याचा आरोप आहे.

या कारवाईत तुकाराम नारायण जुवळे (वय ३५, रा. दापोली, आदर्श शाळेच्या मागील बाजूस, ता. दापोली) याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीकडून १,०५० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई/पोलीस कर्मचारी जगदीश सुरेश आंबवणे यांनी फिर्याद दिली आहे.

दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *