Breaking News
रत्नागिरी : जैतापूर समुद्रात मासेमारी करताना खलाशाला समुद्री सापाचा दंश, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू लांजा : पहाटे महामार्गालगत संशयास्पद वावर, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी घेतले ताब्यात दाभोळ : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची दादरमध्ये भव्य सभा, वणौशी, दुमदेव, भिवबंदरचे ग्रामस्थ एकवटले, आरपारच्या लढ्याचा निर्धार, ‘जमीन आमची, निर्णयही आमचा’ म्हणत प्रकल्पाला विरोध चिपळूण : पहाटे अंधारात संशयास्पद हालचाली, चोरीच्या उद्देशाने दबा धरल्याचा संशय, तरुण पोलिसांच्या ताब्यात रायगड : ‘मी जीवन संपवतोय’, पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला, टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं

रायगड : ‘मी जीवन संपवतोय’, पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला, टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं

banner 468x60

ऐतिहासिक किल्ले रायगडावरून (Raigad Fort) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. “मी टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवत आहे,” असा मेसेज पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवून बेपत्ता झालेल्या 37 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सुयोग सुरेश पांचाळ (वय 37, मूळ रा. बीजघर, खेड, जि. रत्नागिरी; सध्या रा. रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ हा शनिवारी पहाटेच्या सुमारास किल्ले रायगडावर आला होता. त्याने आपली अर्टिगा कार गडाच्या पायथ्याशी पार्क केली आणि पायरी मार्गाने गडावर गेला. सकाळी साडेसातच्या सुमारास तो टकमक टोकावर पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने टकमक टोकाचे फोटो काढून पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवले आणि “मी इथून उडी मारून जीवन संपवत आहे,” असा मेसेज केला. या मेसेजपाठोपाठ त्याचा मोबाईल फोन बंद झाला.


या मेसेजची माहिती मिळताच सुयोगचा भाऊ सुवेल पांचाळ याने तातडीने रायगड गाठले. त्याने टकमक टोकासह गड परिसरात सुयोगचा शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी महाड तालुका पोलिसांना (Mahad Taluka Police) या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गड परिसरात शोध सुरू केला असता गडाच्या पायथ्याशी सुयोगची कार उभी असलेली आढळली. मात्र, रात्र झाल्याने शनिवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली

रविवार सकाळपासून पोलीस पथक, स्थानिक रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. दरी अत्यंत खोल असल्याने शोध घेण्यास अडचणी येत होत्या. अखेर ड्रोनच्या साहाय्याने दरीत पाहणी केली असता एका ठिकाणी सुयोगचा मृतदेह दिसून आला.

दरम्यान, मृत सुयोग हा विठूरायाचा भक्त असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी त्याच्या कपाळाला काळा बुक्का लावलेला होता. एका हसतमुख आणि वारकरी निष्ठा असलेल्या तरुणाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत गूढ निर्माण झाले असून, महाड तालुका पोलीस याप्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *