तालुक्यातील तिसंगी फोजदारवाडी येथे भरधाव वेगतील कारने एसटी बसला ठोकर देऊन अपघात केल्याने या अपघातात बसमधील ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
हा अपघात रविवारी दिनांक ६ रोजी सकाळी ०९:३० वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, खेड आगारातील चालक आर एस शेवरे हे आपल्या ताब्यातील एस टी बस नंबर एम एच १४ बी टी २५९७ ही खेड ते तिसंगी अशी घेऊन जात असताना तिसंगी कडून खेडच्या दिशेने भरधाव वेगात येणारी होंडा
ओक्टिव्हिया गाडी नंबर एम एच ०२ बी टी ४८२६ वरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने समोर असणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या समोरील बाजूचा चुराडा झाला आहे.
या अपघातात एसटी बस मधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याअपघाताबाबत खेड पोलिसात एसटी चालकाने फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*