रत्नागिरी शहरातील अमली पदार्थविरोधी कारवाईअंतर्गत रत्नागिरी शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सहा आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी विभाग यांनी मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी संबंधित आरोपींना दोन वर्षांसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नजफ आसिफ मिरजकर (गवळीवाडा), मस्तान मगदूम शेख (खान कॉम्प्लेक्स, मच्छी मार्केट, बाजारपेठ), अब्दुल रौफ इकबाल डोंगरकर (कर्ला उर्दू शाळेजवळ), सचिन राजाराम महापुस्कर (गवळीवाडा), फुरकान यासिन फणसोपकर (मजगाव रोड) आणि अरमान लियाकत धामस्कर (साईभूमी नगर) यांचा समावेश आहे.
या सहा जणांविरुद्ध सन २०२५ मध्ये हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. संबंधित प्रकरणांवरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले.
अमली पदार्थांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रिय असलेल्या संशयितांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













