रत्नागिरी शहरातील एस.टी. स्टँड ते भगवती बंदर या वर्दळीच्या मुख्य मार्गावर मांडवी भुते नाका चौकात भरधाव ॲक्टिव्हासारख्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता सुधीर चव्हाण (वय ५४, गृहिणी, रा. गणराज रेसिडेन्सी, विनम्र नगर, नाचणे) या २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पती सुधीर चव्हाण यांच्यासोबत मांडवी येथे गेल्या होत्या. दोघांनी रहाटघर पेट्रोल पंप येथे आपली दुचाकी उभी केली आणि त्यानंतर ते पायी जात होते.
मांडवी भुते नाका चौकात दोघेही रस्ता ओलांडत असताना भगवती बंदराच्या दिशेने एस.टी. स्टँडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ॲक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या दुचाकीने सविता चव्हाण यांना जोरदार धडक दिली. चालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुचाकीची जोरदार धडक बसल्याने सविता चव्हाण रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता पसार झाला.
या घटनेप्रकरणी सविता चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मांडवी ते एस.टी. स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपी दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













