दापोली : गावठी हातभट्टीची दारू जप्त, एकावर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली येथील नवेशेत परिसरातील जंगलमय भागात पोलिसांनी कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.५५ वाजण्याच्या सुमारास पांगारी तर्फे हवेली, नवेशेत येथील जंगलमय भागात एका आंब्याच्या झाडाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अनंत महादेव सपकाळ (रा. पांगारी तर्फे हवेली, बौद्धवाडी, ता. दापोली) याच्याकडे गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. ही दारू बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून ७ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ७०० रुपये किमतीची, तसेच दारू ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला कॅन असा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/२०२६ नोंद करण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.०५ वाजता करण्यात आली.

ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बाळू दोबाडे (ब.नं. ४९२) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *