Breaking News
रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘रत्नागिरीचा राजा’च्या मंडपातून चांदीचे ताम्हण लंपास; भरदिवसा 40 हजारांची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त अपरांत हॉस्पिटलकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नवसाचा राजा गणपती मंडळात नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची धडक कारवाई, तीन नौकांवर कारवाई

चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त अपरांत हॉस्पिटलकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नवसाचा राजा गणपती मंडळात नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन

banner 468x60

चिपळूण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने चिपळूण शहरातील नवसाचा राजा गणपती मंडळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गणेशभक्त आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी यांसह प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

दैनंदिन जीवनातील आहाराच्या सवयी, आरोग्याची काळजी, नियमित तपासणीचे महत्त्व तसेच विविध आजारांची प्राथमिक लक्षणे याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली. तपासणीदरम्यान काही आरोग्यविषयक समस्या आढळल्यास पुढील उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सल्ल्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या उत्साहात नागरिकांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. मोफत तपासणीच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आरोग्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा अपरांत हॉस्पिटलचा हा उपक्रम गणेशोत्सवात विशेष ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *