Breaking News
रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त रत्नागिरी : ‘रत्नागिरीचा राजा’च्या मंडपातून चांदीचे ताम्हण लंपास; भरदिवसा 40 हजारांची चोरी, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त अपरांत हॉस्पिटलकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नवसाचा राजा गणपती मंडळात नागरिकांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन रत्नागिरीच्या समुद्रात अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची धडक कारवाई, तीन नौकांवर कारवाई

मंडणगड : तरुणाला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण, धमकीनंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

banner 468x60

मंडणगड कादवण येथे घरात घुसून एका २७ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने एका महिलेचे फोटो काढल्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीनंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या तरुणाने म्हशींना देण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कादवण, ता. मंडणगड येथील एका घरात हा प्रकार घडला. फिर्यादी अनसया संभाजी सोंडकर (वय ४५) यांच्या तक्रारीनुसार, त्या वेळी त्या त्यांचे पती तसेच मुलगा सुरज आणि मुलगी सजाता यांच्यासह घरी उपस्थित होत्या.

याच दरम्यान मिलिंद सोंडकर (वय ३५) आणि मनोज सोंडकर (वय ४१), दोघेही रा. कादवण, हे त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी फिर्यादींचा मुलगा सुरज संभाजी सोंडकर (वय २७) याच्याकडील मोबाईल घेतला.

महिलेचे फोटो काढल्याचा आरोप

तक्रारीनुसार, मनोज सोंडकर याने सुरजला त्याची पत्नी अर्चना हिचे फोटो काढल्याबाबत विचारणा केली. तसेच तिच्याशी तुझा काय संबंध आहे, अशी विचारणा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून सुरजला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केली.

या मारहाणीत सुरज जखमी झाला. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

मारहाणीनंतर तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेनंतर सुरज घाबरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्याने घरात असलेले म्हशींना देण्यात येणारे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर या घटनेची नोंद नवापाडा पोलीस ठाणे शहर येथे करण्यात आली होती.

सदर प्रकरणाचा गुन्हा पुढे मंडणगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाला असून, त्यानंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२३ सप्टेंबरला मंडणगड पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३७ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक ११९/२०२६ असून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत यापूर्वीच्या भारतीय दंड विधानातील कलम ३२४, ५०६ आणि ३४ अनुषंगानेही उल्लेख आहे.

या घटनेतील जखमी सुरज संभाजी सोंडकर (वय २७, रा. कादवण, ता. मंडणगड) याच्याबाबत पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करत आहेत.

दरम्यान, तक्रारीतील आरोपांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *