रत्नागिरी शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
बोटीवर गॅस पेटवताना भडका; भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू
चांदोर तळीवाडी येथील संतोष कृष्णा फुटक (४८) हे बोट खलाशी म्हणून काम करत होते. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते बोटीवर जेवण करण्यासाठी गॅस पेटवत असताना अचानक गॅसचा भडका झाला. या घटनेत त्यांच्या चेहरा, हात आणि पायाला भाजल्याच्या जखमा झाल्या.
बोटमालक सचिन टाकळे यांनी संतोष यांच्या भावाला याबाबत फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर संतोष यांना उपचारासाठी रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, १४ सप्टेंबर रोजी पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.५० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११७/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
कोर्टासमोरील रिक्षा स्टँडवर बेशुद्धावस्थेत; उपचारापूर्वीच मृत्यू
दुसऱ्या घटनेत यसफ गफर काझी (५३), रा. चांदेराई इब्राईम पट्टण, ता. जि. रत्नागिरी, यांचा मृत्यू झाला. ते रिक्षाचालक म्हणून काम करत होते.
२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास यसफ काझी हे कोर्टासमोरील रिक्षा स्टँड येथे बेशुद्धावस्थेत पडले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मोबाईलवरून देण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील अपघात विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४८ वाजता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११८/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण तपास प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













