रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, १८२ पुड्या आणि मोबाईल असा सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन तरुणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.३५ वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार शासकीय वाहनातून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. यावेळी माळनाका एसटी स्टँड, झारणी रोड तसेच मच्छीमार्केट परिसरात पेट्रोलिंग सुरू होते.
मच्छीमार्केट येथील चर्चसमोरील रस्त्यावर संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी संबंधितांची तपासणी केली. या तपासणीत विक्रीच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान ७ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ, त्याच्या १८२ पुड्या, पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टिकची पिशवी आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नर्ममोहम्मद दिलमोहम्मद खान ऊर्फ कल्लू (२५, रा. भाजी मार्केटसमोर, रत्नागिरी) आणि मस्तान मगदम शेख (२६, रा. आजगावकरवाडी, बाजार, रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपराज प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













