दाभोळ येथील ७० वर्षीय महिलेचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. सुनिता बबन मांडवकर (वय ७०, रा. दालभेश्वर पाखाडी, दाभोळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता मांडवकर यांना जुलाब होऊन अंगात ताप वाढत होता. प्रकृती बिघडत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान, रक्त तपासणी करण्यात आली असता त्यांना कावीळ (जॉन्डिस) झाल्याचे निदान झाले. त्यानंतर आवश्यक औषधोपचार सुरू ठेवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली.
अखेर २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मांडवकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी दाभोळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, बीएनएसएस कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













