गुहागर : कौटुंबिक वादातून 58 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन केली आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शीर भाटले-आंबेकरवाडी येथे कौटुंबिक कारणातून झालेल्या वादानंतर ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२० सप्टेंबर) घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन सिताराम आंबेकर (वय ५८, रा. शीर भाटले-आंबेकरवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे रविवारी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घरात होते. याचदरम्यान घरातील कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर घरातील हॉलमध्ये लोखंडी चॅनलला नायलॉन दोरी बांधून त्यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. कुटुंबीयांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेनंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३९/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. याबाबतची नोंद २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.११ वाजता करण्यात आली. मयत बबन आंबेकर यांचा मुलगा योगेश बबन आंबेकर यांनी याबाबत खबर दिली आहे.

घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *