Breaking News
दापोली : कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान, ग्रामस्थांसह मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन रत्नागिरी : राजीवडा समुद्रात मच्छीमार नौका उलटली, आठ जणांचा थरारक बचाव, ‘अल सुरया’वरील खलाशांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला रत्नागिरी : मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग; प्लास्टिक, कचरा गोळा करत सागरी स्वच्छतेचा संदेश रत्नागिरी : लाखो रुपयांचे हेरॉईन जप्त, नेपाळी नागरिकांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा खेडमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रत्नागिरी : मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त विविध संस्थांचा सहभाग; प्लास्टिक, कचरा गोळा करत सागरी स्वच्छतेचा संदेश

banner 468x60

‘सुरक्षित किनारपट्टी–समर्थ भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीतील प्रसिद्ध मांडवी किनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ उत्साहात पार पडले. सागरी सीमा मंच, रत्नागिरी जिल्हा आणि विविध स्थानिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे, सागरी पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच पर्यटनाला चालना देणे, या उद्देशाने ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मांडवी पर्यटन विकास सेवा संस्था, लायन्स क्लब रत्नागिरी, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी शहर व्यापारी संघ आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांसह विविध सामाजिक व व्यावसायिक संस्थांनी सहभाग घेतला.

अभियानादरम्यान स्वयंसेवकांनी मांडवी किनाऱ्यावर पडलेला प्लास्टिक, काच, विविध प्रकारचा कचरा आणि टाकाऊ पदार्थ गोळा करून किनारा स्वच्छ केला. यासोबतच नागरिक आणि पर्यटकांमध्ये सागरी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

‘स्वच्छ सागर… सुरक्षित सागर… समृद्ध सागर…’ हा संदेश देत समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. किनाऱ्यांचे पर्यावरण आणि सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी नागरिक, स्थानिक संस्था आणि पर्यटकांनी सामूहिक जबाबदारीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

या स्वच्छता अभियानाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *