रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणीचे नाव दिपाली दयानंद ठाकूर (वय २२) असून ती रत्नागिरी खालची आळी येथे राहत होती. तिचे मूळ गाव दारिस्ते-पवारवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग असल्याची नोंद आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दिपाली यांच्या पोटात दुखू लागले तसेच जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तत्काळ रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५२ वाजता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. पियुष उमलमुगले यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ११३/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













