मंडणगड तालुक्यातील पणदेरी परिसरात गांजाचे सेवन करताना चार जण आढळून आल्याने मंडणगड पोलिसांनी त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली आहे.
पहिली कारवाई १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पणदेरी गावानजीक रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. साबर रजा अमिर बुरुणकर (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड) हा गांजा सेवन करताना आढळून आला. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर त्याच रात्री सुमारे ९.१० वाजता पणदेरी गावानजीक नदीच्या बाजूला पोलिसांनी दुसरी कारवाई केली. येथे आदेश उदय तांबे (वय ३४), समिर विलास तांबे (वय २५), दोघेही रा. पेवे बौद्धवाडी, ता. मंडणगड, तसेच आसिफ अ. समद ठोकण (वय ३०, रा. पणदेरी, ता. मंडणगड) हे तिघे गांजा सेवन करताना आढळून आले.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला असून, तिघांविरोधातही एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दोन्ही कारवायांची नोंद १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात आली. या कारवाईमुळे पणदेरी परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













