महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC And HSC Board Exam 2027) जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती आहे. सविस्तर वेळापत्रक (SSC And HSC Board Exam 2027) नंतर जाहीर होणार असून या तारखांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी व्यवस्थित नियोजन करता येणार आहे.(SSC And HSC Board Exam 2027) राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) आणि दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.(SSC And HSC Board Exam 2027)
बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून, मंगळवार, 16 मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन गुरुवार, 11 मार्च रोजी संपणार आहे. लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तसेच परीक्षेच्या काळात त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, या दृष्टीने मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













