रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यसेवन आणि विनापरवाना हातभट्टी दारूविरोधात पोलिसांनी कारवाई केली. लांजा, दापोली आणि राजापूर तालुक्यात १५ सप्टेंबर रोजी झालेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लांजा : कुवे-मावळतवाडी परिसरात १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुपेश रमेश नेमण (वय ३४, रा. कुवे मावळतवाडी, ता. लांजा) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी अस्मिता मानसिंग पाटील यांनी फिर्याद दिली.
दापोली : बुरोंडी बाजारपेठ येथे पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविरोधात कारवाई केली. केतन कमलाकर केळसकर (वय ३२, रा. बुरोंडी, ता. दापोली) याच्याकडे सुमारे ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. सुमारे ८०० रुपये किमतीची दारू आणि ती ठेवण्यासाठी वापरलेला १० लिटर क्षमतेचा प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आला. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०५/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी संदीप किसन पारधी यांनी फिर्याद दिली.
राजापूर : पाचल बाजारपेठेतील सरकारमान्य देशी दारू दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने तुकाराम बाबाजी गुरव (वय ४९, रा. वाळवड, गुरववाडी, ता. राजापूर) याच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी स्वप्नील प्रताप घाटगे यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी केलेल्या या तीन स्वतंत्र कारवायांमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन तसेच विनापरवाना हातभट्टी दारू बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













