संगमेश्वर तालुक्यातील नांदळज गावातील श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. काळीदास किसनराव देशमुख (वय ५२, रा. मु.पो. गौर, ता. कळम, जि. धाराशिव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळीदास देशमुख हे विविध ठिकाणी सेंटरिंग, प्लास्टर तसेच लादी बसविण्याचे काम करण्यासाठी जात होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिस नोंदीत नमूद करण्यात आली आहे.
मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्यापूर्वी नांदळज येथील श्री सुखाई देवी मंदिर परिसरातील कार्यक्रमाच्या स्टेजवर देशमुख हे अंथरुणावर उपडे पडलेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील जयराम भिकाजी रहाटे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधितांना याची माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करत प्रकरणाची नोंद केली. या घटनेमुळे नांदळज परिसरात काही काळ खळबळ उडाली.
दरम्यान, काळीदास देशमुख यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आमृ क्रमांक ३७/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













