मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेड बुद्रुक येथे दुचाकी चालकाच्या डोळ्यावर अचानक झापड आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मागे बसलेला तरुण उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने जखमी झाला. ही घटना बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलसमोर घडली.
या अपघातात अनिकेत प्रमोद मनवे (२३) आणि कल्पेश नामदेव मनवे (२३), दोघेही रा. उजगाव शेवरवाडी, ता. संगमेश्वर हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत मनवे हा ड्रीम युगा मोटरसायकल (एमएच ०८ एबी ४०६४) घेऊन मागे कल्पेश मनवे याला बसवून रत्नागिरीहून उजगावच्या दिशेने निघाला होता. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करत असताना आंबेड बुद्रुक येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलसमोर चालकाच्या डोळ्यावर अचानक झापड आली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली.
अपघातात अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर कल्पेशच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













