खेड : बांधकाम साइटवर पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील भरणे नाका येथील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साइटवर काम करत असताना पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने २९ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इदहारअली हदीस मन्सुरी (वय २९, रा. संतपूर, थाना मांझागढ, ता. मांझागढ, जि. गोपालगंज, बिहार) हे भरणे नाका येथील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या साइटवर काम करीत होते. काम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून त्यांचा अचानक तोल गेला. यावेळी ते फळीसमवेत खाली पडून पॉडियम पार्किंगच्या स्लोपवर आदळले.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला, डाव्या हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खेड येथील मधुसिद्धी हॉस्पिटल, डॉ. उपेंद्र तलाठी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक ७६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *