दापोली : एसटी स्टँडमागे विजेचा खांब रस्त्यावर कोसळला, रुपनगरातील वाहतूक ठप्प, नागरिकांची गैरसोय

banner 468x60

दापोली एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या रुपनगर परिसरात रहदारीच्या रस्त्यावर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाची धडक बसल्याने खांब बुंध्यातून पूर्णपणे तुटून रस्त्यावर आडवा पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

खांब थेट रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रुपनगर परिसरातील हा रस्ता स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांच्या नियमित वापरातील असल्याने अचानक रस्ता अडवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, रस्त्यावर कोसळलेला विजेचा खांब बराच वेळ तसाच राहिल्यास अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीस्वार किंवा रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा अडथळा धोकादायक ठरू शकतो.

त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यावर पडलेला खांब हटवावा आणि वीजपुरवठ्याची सुरक्षितता तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *