देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि सुप्रो टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रत्नागिरीहून देवरूखच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, पाटगाव येथील गोपाळवाडीच्या दिशेने जाण्यासाठी सुप्रो टेम्पो वळत असताना समोरून आलेल्या भरधाव दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन लगारे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल आर्या वेलवणकर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













