Breaking News
चिपळुणात बनावट फूड इन्स्पेक्टरकडून खंडणीचा प्रयत्न, हॉटेल चालकाची सतर्कता, 24 दिवस हॉटेल सील करण्याची आणि 65 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्याची भीती दापोली : ‘रेंट-अ-बाइक’ योजना सुरू करा; राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन, पर्यटकांची सोय होणार, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार चिपळूण : सावर्डेच्या गोविंदराव निकम विद्यालयात आधुनिक संगणक कक्ष, Deepak Novochem Technologies Ltd. कडून 20 संगणकांचे योगदान, ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी दापोली : 612 गुंठे वक्फ जमीन व्यवहाराची चौकशी होणार, अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश, 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे वक्फ मंडळाला आदेश दापोली : आझाद मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

रत्नागिरी : शहरात हेरॉईनसह एकाला ताब्यात, 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने निवखोल परिसरात कारवाई करत ब्राऊन हेरॉईनसह एका इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईत दुचाकीसह एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई निवखोल येथील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १७ च्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीम युसुफ मुल्ला (वय ३५, रा. राजिवडा, रत्नागिरी) याच्याकडे २.५ ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आढळून आले.


सदर इसम हा हे अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक कारवाईत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईत एमएच ०८ एएम ३२१२ क्रमांकाची दुचाकी आणि ब्राऊन हेरॉईन असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस फौजदार दिपक साळवी, पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर, शांताराम झोरे, दिनेश आखाडे तसेच पोलीस कर्मचारी अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *