खेड : कायदा-सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्याचा खरा सन्मान, मंत्री योगेश कदम यांचं संबोधन, खेड तहसील कार्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

banner 468x60

भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन खेड तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना मंत्री योगेश कदम यांनी “कायदा व सुव्यवस्था राखणे हाच स्वातंत्र्य आणि संविधानाचा खरा सन्मान आहे,” असे सांगितले. स्वातंत्र्य केवळ हक्कांचा उपभोग घेण्यासाठी नसून प्रत्येक नागरिकाने देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी नुकत्याच केलेल्या कारगिल दौऱ्याचा अनुभवही उपस्थितांशी शेअर केला. कारगिलच्या प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी लढलेल्या शूर जवानांच्या त्यागाला आणि शौर्याला त्यांनी अभिवादन केले. सैनिकांचे बलिदान, देशाचा गौरवशाली इतिहास आणि स्वातंत्र्याचे महत्त्व भावी पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा प्रणीत रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने नागरिकांना मिठाई आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला तहसीलदार सुधीर सोनावणे, खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटविकास अधिकारी करपे, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, खेड नगराध्यक्ष माधवाई बुटाला, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी सणस, खेड पोलीस निरीक्षक अहिरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून स्वातंत्र्याचा सन्मान राखताना कायदा, संविधान आणि नागरिकांची कर्तव्ये यांना प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *