Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी

banner 468x60

मंडणगड येथे मध्यरात्री अचानक प्रकृती गंभीर झालेल्या नेपाळी महिलेच्या मदतीसाठी मंडणगड पोलिसांनी तातडीने धाव घेत तिचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना नागरिकाने केलेला ‘११२’ हेल्पलाईनवरील फोन या महिलेसाठी अक्षरशः जीवनदायी ठरला.

मंडणगड शहर परिसरातील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या क्लासिक फार्म हाऊस येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक नेपाळी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील एका महिलेला रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आकडी आल्यासारखे होऊन तीव्र वेदना सुरू झाल्या. काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी चादरीच्या सहाय्याने चार जणांच्या मदतीने तिला रस्त्यापर्यंत आणले.

मात्र, रात्रीची वेळ असल्याने रिक्षाचालकांशी संपर्क साधूनही कोणी मदतीसाठी येण्यास तयार नव्हते. रुग्णवाहिकेशी संपर्क करण्याचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिक राजेश पारेख यांनी तातडीने ‘११२’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधला.

कॉल मिळताच बक्कल क्रमांक १२३७ असलेले पोलीस कर्मचारी पहुरकर, पारधी, पीएसआय शीत, पोलीस हवालदार सुकाळे आणि चालक रामसिंग पवार यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला आवश्यक सहकार्य करत शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने तिला पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

माणगाव येथील रुग्णालयात महिलेची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर महिलेची प्रकृती सुधारली असून ती आता आपल्या कुटुंबीयांसह मंडणगड येथे सुखरूप परतली आहे.

मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक तसेच उपचारासाठी मदत करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल राजेश पारेख यांनी आभार व्यक्त केले.

आपत्कालीन परिस्थितीत ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधल्यास गरजू नागरिकांना तातडीने मदत मिळू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. पोलिसांच्या तत्पर प्रतिसादामुळे एका महिलेवर वेळीच उपचार होऊन तिचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *