Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दापोली-करजगाव मार्गावर एसटी बस आणि रिक्षाची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

banner 468x60

दापोली-करजगाव मार्गावर एसटी बस आणि रिक्षाची धडक होऊन अपघात झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी चंद्रनगर फाटा ते चंद्रनगर चिंच झाड परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

दापोली आगाराची एसटी बस क्रमांक MH 14 NE 5232 ही दापोलीहून करजगावच्या दिशेने जात असताना चंद्रनगर चिंच झाड फाटा परिसरात आली. यावेळी TVS रिक्षा क्रमांक MH 08 AO 8490 ही एसटी बसच्या समोरील उजव्या दर्शनी भागावर येऊन आदळली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

एसटी बसच्या समोरील उजव्या बाजूचे अंदाजे ५ हजार रुपयांचे, तर रिक्षेचे अंदाजे २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या घटनावृत्तात नमूद करण्यात आली आहे.

या बसचे चालक नितीन भानुदास व्हावळे आणि वाहक गणेश दिगंबर आकरे होते. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच बस चालक, वाहक आणि रिक्षाचालकही सुखरूप आहेत.

या अपघातात प्रथमदर्शनी त्रयस्थ रिक्षाचालक जबाबदार असल्याचे एसटी प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *