Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

मंडणगड : बसस्थानकात अस्वच्छतेचे साम्राज्य, प्रवाशांच्या सुविधांकडे एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष

banner 468x60

मंडणगड शहरातील एसटी बसस्थानकाची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली असून, बसस्थानक परिसरात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. बसस्थानकाची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसस्थानक परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा आणि अस्वच्छता दिसून येत आहे. प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छतेची अशी अवस्था का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, मंडणगडसाठी नवीन बसस्थानक उभारण्याच्या चर्चा आणि कामांदरम्यान सध्याच्या बसस्थानकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. नवीन बसस्थानक उभारल्यानंतरही जर स्वच्छता आणि देखभालीची योग्य व्यवस्था नसेल, तर पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बसस्थानकात सर्वप्रथम आवश्यक कामगारांची नियुक्ती करून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी. तसेच कचरा व्यवस्थापन, शौचालयांची स्वच्छता आणि परिसराची नियमित देखभाल याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मंडणगड बसस्थानकाचा वापर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी करतात. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. महापरिवहन विभागाने मंडणगड बसस्थानकाच्या सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

“नवीन बसस्थानक करा, मात्र त्याची देखभालही योग्य पद्धतीने करा; केवळ इमारत उभारून उपयोग नाही,” अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने स्वच्छता व मनुष्यबळाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *