Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : रत्नागिरी जिल्हा पोलिसांची धडक कारवाई, केबल चोरी प्रकरणातील आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

banner 468x60

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा खेड पोलिसांनी छडा लावत आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत ही कारवाई केली.

केबल चोरीच्या या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करत आरोपीचा माग काढला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सांगोला परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खेड पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेल्या केबलमधील तांब्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे केबल चोरीच्या या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, चोरीतील इतर मुद्देमाल तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि त्यांच्या पथकाने केली.

रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासाच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *