रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरजोळे येथील पाटीलवाडी नदीकिनारी जंगलमय आणि झाडीझुडपांच्या भागात कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व कुजके रसायन असा एकूण ६७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत संदीप वसंत जाधव (वय ४९, रा. घर नं. २६९, मिरजोळे, बौद्धवाडी, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.०५ वाजता मिरजोळे, पाटीलवाडी नदीकिनारी जंगलमय भागात ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे गळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन तसेच दारू गाळण्यासाठीचे विविध साहित्य आढळून आले.
कारवाईदरम्यान एका २०० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये सुमारे १०० लिटर कुजके रसायन आढळले. याशिवाय सात बॅरलमध्ये एकूण सुमारे १२०० लिटर गळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन, १८ प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे ३६० लिटर कुजके रसायन, तसेच दोन प्लास्टिक कॅनमध्ये सुमारे ४० लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली.
पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी अॅल्युमिनियमची डेग, लाकडी चाट, स्टीलची नळी, प्लास्टिक पाईप आणि अन्य साहित्यही जप्त केले. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹६७,८०० असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन प्रभाकर डोमणे यांनी फिर्याद दिली असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०९ वाजता दाखल करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













