दापोली तालुक्यातील पालगड-कातळवाडी येथे घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनच्या स्लायडिंग खिडकीतून घरात प्रवेश करून तब्बल ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.४५ ते ९.१० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी शुभांगी विष्णू दळवी (रा. पालगड-कातळवाडी, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व ३०५ तसेच घरफोडी व चोरीसंदर्भातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ११ ऑगस्ट रोजी रात्री ८.१३ वाजता दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या किचनच्या स्लायडिंग खिडकीतून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरट्याने लंपास केली. या पर्समध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने होते.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये —
सुमारे ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र — किंमत अंदाजे ४ लाख २० हजार रुपये
सुमारे ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस — अंदाजे ७० हजार रुपये
सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन — अंदाजे १ लाख ५० हजार रुपये
सुमारे ५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या — अंदाजे ५० हजार रुपये
सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट — अंदाजे १ लाख रुपये
अशा एकूण ७ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील माहिती तसेच घटनास्थळावरील संभाव्य पुरावे तपासले जात आहेत. सकाळच्या वेळेत घरात कोणी नसल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













