Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात

banner 468x60

डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये क्रांती दिनानिमित्त देशभक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या सौ. वेदिका राणे यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध देशभक्तीपर गीते सादर केली. विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या स्पर्धेत अकरावी विज्ञान शाखेने प्रथम क्रमांक पटकावला. तर बारावी कला आणि वाणिज्य शाखेला विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला.

कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या वेदिका राणे म्हणाल्या, “आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. त्यामुळे या स्वातंत्र्याचे मोल ओळखून ते टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची, विशेषतः युवा पिढीची जबाबदारी आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *