Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दाभोळ : कोळथरे येथे उद्यानविद्या दिन उत्साहात साजरा, रानभाज्यांचे प्रदर्शन अन् फ्रूट कार्व्हिंगने वेधले लक्ष

banner 468x60

उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील ‘हरितसंगिनी’ विद्यार्थी गटाच्या वतीने कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन माध्यमिक शाळेत उद्यानविद्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रानभाज्यांचे प्रदर्शन, फळांपासून कलाकृती तयार करण्याचा ‘फ्रूट कार्व्हिंग’ उपक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

उद्यानविद्येचे महत्त्व, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि त्यांचा दैनंदिन आहारातील उपयोग याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुष्पगुच्छ तयार करण्याची स्पर्धा आणि फ्रूट कार्व्हिंग स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध फळांचा कलात्मक पद्धतीने वापर करत आकर्षक कलाकृती साकारल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळाला.

यासोबतच गावातील महिलांसाठी रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांपासून चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करून महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. रानभाज्यांचा आहारातील वापर आणि त्यांचे महत्त्व याबाबतही या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमास उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीचे डॉ. पी. सी. माळी, डॉ. प्रविण झगडे, डॉ. विशाल केळसकर, तसेच शाळेचे उपाध्यक्ष गजानन बडे, मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, सचिव रमेश कनगुटकर, प्रगतशील शेतकरी सुनील पेठे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. पी. सी. माळी आणि डॉ. प्रविण झगडे यांनी विविध स्पर्धांचे परीक्षण केले. त्यांनी सहभागी विद्यार्थी आणि महिलांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘हरितसंगिनी’ विद्यार्थी गटातील धनश्री चौगुले, श्रावणी कालेकर, साक्षी वालपकर, श्रद्धा कोतवाल, विशाखा आंबवले, यशिका करकेरा, अनया वराडकर, सानिका नाकील, अनुजा साळुंखे, सिद्धी धनावडे, सानिया पासिलकर, दिया म्हादये, सृष्टी पुरी आणि श्रावणी आरेकर या विद्यार्थिनींनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे, तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. गुढदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व, उद्यानविद्येतील विविध संधी आणि फळे-फुलांच्या माध्यमातून सर्जनशीलतेला मिळणारा वाव यांचा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. विद्यार्थी आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उद्यानविद्या दिनाचा कार्यक्रम आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *