Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : बंद घराचे कडी-कुलूप तोडून ३ लाख ३७ हजारांचा ऐवज लंपास; पिंपळी बुद्रुक येथे घरफोडी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मौजे गझमल पिंपळी बुद्रुक येथे बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

मूळचे पिंपळी बुद्रुक येथील रहिवासी आणि सध्या परळ, मुंबई येथे वास्तव्यास असलेले विलास रघुनाथ गझमल (वय ६१) यांचे पिंपळी बुद्रुक येथील घर २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. चोरी झालेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख १० हजार ९११ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६ हजार ३२१ रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

या घटनेप्रकरणी तक्रारदार विलास गझमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा अधिक तपास पोलीस करत असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *