Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : करंबेळेत तरुण व्यावसायिकाची आत्महत्या; हसतमुख प्रदीप पवारच्या अकाली निधनाने हळहळ

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील २७ वर्षीय तरुण व्यावसायिक प्रदीप प्रकाश पवार याने स्वतःच्या सर्व्हिसिंग रॅम्पच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी, ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. अत्यंत हसतमुख, मनमिळाऊ आणि कष्टाळू स्वभावाच्या प्रदीपने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने करंबेळेसह संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रदीप पवार हा करंबेळेच्या हद्दीत देवरूख-संगमेश्वर रस्त्यालगत सर्व्हिसिंग रॅम्पचा व्यवसाय करत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सुमारे ७.४५ वाजता तो आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गेला होता. दररोज रात्री ८ वाजेपर्यंत काम आटोपून तो घरी परतत असे. मात्र शुक्रवारी रात्री उशीर होऊनही तो घरी परतला नाही.

त्यामुळे त्याचा भाऊ प्रशांत पवार यांनी प्रदीपला फोन केला. मात्र वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशांत यांना संशय आला. त्यांनी रात्री साडेआठच्या सुमारास सर्व्हिसिंग रॅम्प गाठला. त्यावेळी शेडचे शटर बंद होते, तर बाहेर प्रदीपची मोटरसायकल उभी होती. शटर उघडून आत पाहिले असता प्रदीपने शेडच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

प्रदीप हा शांत, कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभावाचा तरुण म्हणून परिसरात परिचित होता. गावातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या प्रदीपचा मित्रपरिवारही मोठा होता. व्यवसाय सांभाळताना त्याने अल्पावधीतच अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संपूर्ण संगमेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे.

प्रशांत पवार यांनी दिलेल्या खबरीवरून देवरूख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल ए. ए. वेलवणकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *