Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघांवर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळलेल्या तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भोस्ते पुलालगतच्या स्मशानभूमी परिसरात दत्ताराम लक्ष्मण रहाटे (वय ६९, रा. रहाटेवाडी, भोस्ते, ता. खेड) हे कोणताही वैध परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना रंगेहात आढळले. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. २१८/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा दुपारी १.३२ वाजता दाखल करण्यात आला.

दुसऱ्या प्रकरणात दुपारी ३.१० वाजता शिवतर रोडवरील योगायोग हौसिंग सोसायटीसमोरील सार्वजनिक उद्यानाजवळील झाडाखाली पंकज गणपत कदम (वय ३६, व्यवसाय रिक्षाचालक, रा. सम्राट अशोकनगर, खेड) हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळले. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. २१९/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार अलिमोद्दीन बदीयोद्दीन शेख यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा सायंकाळी ६.१८ वाजता नोंदविण्यात आला.

तिसऱ्या प्रकरणात त्याच परिसरात दुपारी ३.४५ वाजता शुभम वैभव जाधव (वय २१, व्यवसाय मजुरी, रा. शिवतर रोड, सम्राट अशोकनगर, खेड) हा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करताना रंगेहात आढळला. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्र. २२०/२०२६ दाखल करण्यात आला असून, पोलीस शिपाई सोहेल इक्बाल ढगे यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा सायंकाळी ६.२८ वाजता दाखल करण्यात आला.

तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *