राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावातील आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.४१ वाजता नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८, ३(५) अन्वये (पूर्वीचे भादंवि कलम ३०६, ३४) कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी सरिता संजय ताम्हणकर (वय ५२, रा. ताम्हाणे, ताम्हणकरवाडी, ता. राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी नामदेव गोविंद ताम्हणकर (५६), अनिता नामदेव ताम्हणकर (५०), मनोहर सोमा ताम्हणकर (६८), मनिषा मनोहर ताम्हणकर (६३), विशाल मनोहर ताम्हणकर (३९) आणि सागर मनोहर ताम्हणकर (३७), सर्व रा. ताम्हाणे, ता. राजापूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी नामदेव गोविंद ताम्हणकर व अनिता नामदेव ताम्हणकर यांचा मुलगा प्रथमेश याचा २०१५ मध्ये मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू फिर्यादीचे पती संजय गोविंद ताम्हणकर यांनी केलेल्या कथित देवदेवस्कीमुळे झाल्याचा समज करून घेत आरोपी गेल्या सुमारे दहा वर्षांपासून संजय ताम्हणकर यांना सतत टोमणे मारणे, शिवीगाळ करणे व मानसिक त्रास देत होते, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर यांनी जमिनीच्या वादातून फिर्यादीचे पती तसेच मुलगी प्रियांका आणि मुलगा साहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही जमिनीच्या वादावरून सातत्याने शिवीगाळ व मानसिक छळ केल्यामुळे संजय ताम्हणकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













