Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

शृंगारतळी : भरदिवसा महिलेच्या गळ्यातील 25 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले, दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध

banner 468x60

गुहागर तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ३० जुलै) दुपारी घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी. अवनी समीर पागडे (वय ३६, रा. वाकी, पो. आरे स्वातंत्र्यवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकी-पिंपळवट सीमेवर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान बंद करून आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी आरे–पाटपन्हाळे रस्त्याने पायी जाण्यास सुरुवात केली.

यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेला एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ थांबला. त्याने काळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला होता आणि डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. क्षणाचाही विलंब न लावता त्याने सौ. पागडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले आणि पाटपन्हाळे गावाच्या दिशेने वेगाने पसार झाला.

चोरीस गेलेले मंगळसूत्र एक पदरी असून त्यामध्ये काळे व सोन्याचे मणी गुंफलेले आहेत तसेच एक डवळी (वाटी) आहे. सुमारे पाच ग्रॅम वजनाच्या या वापरातील मंगळसूत्राची किंमत अंदाजे २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटना घडल्यानंतर घाबरलेल्या. पागडे यांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भरदिवसा निर्जन रस्त्यावर घडलेल्या या धाडसी हिसकावण्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित दुचाकीचा मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे काम गुहागर पोलीस करत आहेत. तसेच नागरिकांनी अपरिचित व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *