Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, बैल, गाय व पाडीची सुटका, मंडणगड, महाड येथील दोघांना अटक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी तातडीची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एक बैल, एक गाय, एक पाडी तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो पिकअप असा एकूण ₹३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील सोवेली येथील ज्ञानेश्वरी स्टॉप परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी महमद कादीर पोवेकर (वय ३५, रा. ममर्शी मुस्लिम मोहल्ला, ता. महाड, जि. रायगड) आणि तसलीम (वय ३२, रा. ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हे महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप (क्रमांक MH-06-CP-0858) मधून जनावरांची वाहतूक करत असताना पोलिसांच्या हाती लागले.

तपासादरम्यान गाडीमध्ये एक बैल, एक गाय आणि एक पाडी यांना अत्यंत कमी जागेत कोंबून घट्ट दोरीने बांधण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे जनावरांना हालचाल करणेही शक्य नसून त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना व त्रास होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्राथमिक तपासात ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजेंद्र रामचंद्र फणसे (वय ५८, व्यवसाय – शेती, रा. सोवेली (सावंतवाडी), पो. मगीज, ता. दापोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(अ), ११(१)(ड), ११(१)(ह), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, प्राण्यांचे परिवहन नियम, १९७८ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ३.५५ वाजता अटक करण्यात आली.

या कारवाईत सुमारे ₹१५ हजार किमतीचा चार वर्षांचा बैल, ₹६ हजार किमतीची अडीच वर्षांची गाय, ₹३ हजार किमतीची एक वर्षांची पाडी तसेच ₹३ लाख किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ₹३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून जनावरांच्या अवैध वाहतूक व कत्तलीच्या प्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *